IPL 2022 Retention Live Updates : रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत ठरले सर्वात महागडे खेळाडू; जाणून घ्या 8 फ्रँचायझींच्या रिटेन खेळाडूंची संपूर्ण लिस्ट

Indian Premier League 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी 8 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली. पंजाब किंग्सनं फक्त दोनच खेळाडूंना कायम राखले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आहे. आज एकूण 27 खेळाडूंना कायम राखले गेले आणि त्यात रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रत्येकी 16 कोटींची किंमत घेऊन सर्वात महागडे खेळाडू ठरले.

चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी)

राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी)

दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी), पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक

पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)

सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी)

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)