IPL 2021 : 'ही कसली खिलाडूवृत्ती?'; ड्वेन ब्रोव्होच्या कृतीनं क्रिकेटवर्तुळात संताप, फ्रँचायझी बैठकीत मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या.

या सामन्यात CSKचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) यानं अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. पण, याच सामन्यात ब्राव्होच्या एका कृतीनं क्रिकेतवर्तुळ संतापले आहे.

समालोचक हर्षा भोगले ( Harsha Bhogle) यांनी तर 'मंकडींग'ला मान्यता द्या अशी जोरदार मागणी करताना ब्राव्होच्या कृतीचा मुद्दा फ्रँचायझींनी त्यांच्या बैठकीत मांडावा, अशी मागणी केली.

CSKच्या डावात मुस्ताफिजून रहमान यानं नो बॉल टाकला आणि रिप्लेमध्ये तो दाखवण्यात आला. पण, त्या रिप्लेनंतर रहमान राहिला बाजूला ब्राव्होच्या त्या कृतीचीच चर्चा सुरू झाली. ब्राव्हो क्रीजपासून बराच लांब उभा असलेला दिसत होता.

यावरून भोगले यांनी त्याचे कान टोचले. ते म्हणाले,बघा ब्राव्हो कुठे उभा आहे. त्यामुळेच मंकडींगलाही मान्यता द्या, तो गोलंदाजाचा हक्कच आहे आणि याची चर्चा बैठकीत व्हायला हवी. मंकडींगला तुम्ही खिलाडूवृत्तीचा लेबल लावत असाल, तर याला काय म्हणाल, नॉनसेन्स.