IPL 2021: यंदाची आयपीएल स्पर्धा कोणता संघ जिंकणार?, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केली भविष्यवाणी!

IPL 2021: आयपीएलच्या १४ व्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होतेय. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूनं विजेत्या संघाची भविष्यवाणीच करुन टाकलीय.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

स्पर्धेचा अद्याप पहिला सामना देखील खेळविण्यात आलेला नाही आणि त्याआधी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी स्पर्धेचे विजेतेपद कोणता संघ पटकावेल यांची भविष्यवाणीच करुन टाकलीय.

मायकल वॉन यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सला हरवणं इतर संघांना कठीण जाणार आहे आणि हाच संघ यंदाही आयपीएलचं जेतेपद पटकावेल अशी भविष्यवाणी केली.

मायकल वॉन यांनी मुंबई इंडियन्स संघासोबतच आणि एका संघाला आपली पसंती दर्शवली आहे.

गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाचाही विजेता ठरेल. पण काही कारणांमुळे मुंबईचा संघ जिंकला नाही तर यंदाची आयपीएल ट्रॉफी सनरायझर्स हैदराबादचा संघ उंचावेल, असं मायकल वॉन यांनी म्हटलं आहे.

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन सोशल मीडियावर विशेषत: ट्विटवर खूपच सक्रिय असतात. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान त्यांनी भविष्यवाणी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारत 3-0 ने जिंकेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. भारताने सिरीज जिंकली खरी पण भारताला एक सामना गमवावा लागला. भारताने इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने हरवलं.

मायकल वॉन यांच्यासोबतच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही मुंबई इंडियन्स संघालाच आपली पसंती दिली आहे.

मुंबईला हरवणं इतकी सोपी गोष्ट नाही. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता प्रतिस्पर्धी संघांसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे, असं गावस्कर म्हणाले होते.

इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या अशा एकापेक्षा एक खेळाडूंचा मुंबईच्या संघामध्ये भरणा आहे. त्यामुळे मुंबईला हरवणं कठीण आहे, असा दावा गावस्कर यांनी केला आहे.