रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?

IPL 2021, MI vs RCB Live Updates - विराट कोहली आज भलत्याच फॉर्मात दिसत आहे. त्यानं आज १३वी धाव घेत ट्वेंटी-२०त १० हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय व जगातल्या पाचव्या फलंदाजाचा मान पटकावला.

IPL 2021, MI vs RCB Live Updates : प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मागील सामन्यातील स्टार देवदत्त पडिक्कल दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सनं ( MI) ७ धावांवर RCBला पहिला धक्का दिला.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे आणि त्यांची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. RCBचीही पराभवाची मालिका कायम असली तरी ते तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २८ वेळा एकमेकांना भिडले आहेत, त्यात रोहितच्या संघानं १७ विजय मिळवले आहेत.

मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला मैदानावर उतरवले आहे. RCBनंही तीन बदल केले आहेत. वनिंदू हसरंगा, टीम डेव्हिड आणि नवदीप सैनी यांच्याजागी डॅन ख्रिस्टियन, कायले जेमिन्सन व शाहबाज अहमद यांना संधी मिळाली आहे. आयपीएलच्या या टप्प्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आल्यानं क्रिकेटपटूंचा उत्साहही अधिक वाढला आहे.

त्यात क्रिकेटपटूंच्या कुटूंबातील सदस्यही सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना बीसीसीआयनं तयार केलेल्या बायोबबलमध्ये राहावं लागत आहे आणि त्यांच्यासाठी स्टेडियमवरही खास व्यवस्था केली गेली आहे. त्यात रोहित शर्माची पत्नी रितिका याच्या मागे उभ्या असलेल्या सुंदरीनं सर्वांचे लक्ष वेधले.

ब्लॅक स्कर्ट अन् व्हाईट टॉप घातलेली ही मुलगी कोण आहे, याची उत्सुका लागली होती

ती हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच आहे, आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आज हार्दिक पहिलाच सामना खेळत आहे आणि त्याला चिअर करण्यासाठी ती आली आहे.