IPL 2021 Auction : फ्रँचायझींच्या पर्समध्ये ८५ कोटी; CSKकडे फक्त १५ लाख, जाणून घ्या कोणाच्या खात्यात किती रक्कम!

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) 2021 साठी ११ फेब्रुवारीला मिनी ऑक्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याकरिता BCCIनं सर्व फ्रँचायझींना त्यांच्या संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या व करारमुक्त करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी २१ जानेवारीपर्यंत मागवली आहे.

आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार असल्यामुळे यंदा मेगा ऑक्शन न करण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ससह ( Chennai Super Kings) इतर संघांना मिनी ऑक्शनवर समाधान मानावे लागेल. त्यामुळे आता फ्रँचायझींना त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या रकमेनुसार संघंबांधणी करावी लागणार आहे. सर्व फ्रँचायझींच्या खात्यात फक्त ८५ कोटी रक्कम शिल्लक आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) सर्वात कमी १५ लाख रुपये शिल्लक आहेत. आपल्या खात्यातील रक्कम वाढवण्यासाठी चेन्नई केदार जाधव, पियुष चावला या दोन खेळाडूंना रिलिज करण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम कुरन, रवींद्र जडेजा आणि दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यु प्लेसिस यांना कायम राखले जाणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) खात्यात १.९५ कोटी रक्कम आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या हे MIचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांच्याशिवाय जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक यांना कायम राखले जाईल. सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, ख्रिस लिन, आदित्य तरे यांना रिलिज केलं जाऊ शकतं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Channel Bangalore ) संघाकडे ६.४ कोटी रक्कम शिल्लक आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, अॅरोन फिंच हे कायम राहतील, तर उमेश यादव, मोईन अली, ख्रिस मॉरिस यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. पार्थिव पटेलनं निवृत्ती घेतली आहे आणि तो मुंबई इंडियाच्या टॅलेंट स्काऊट मोहीमेत सहभागी झाला आहे. डेल स्टेन यंदा आयपीएल खेळणार नाही.

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) कडे ८.५ कोटी आहेत. दिनेश कार्तित, इयॉन मॉर्गन, टॉम बँटन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स हे संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. तरीही रसेलसह सुनील नरीनला रिलिज केले जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) कडे ९ कोटी आहेत आणि ते संघात फार फेरफार करतील असे वाटत नाही. श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा, रिषभ पंत, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, मार्कस स्टॉयनिस हे कायम राहतील. पण, पृथ्वी शॉसह तुषार देशपांडे, शिमरोन हेटमायर आदींना रिलिज केलं जाऊ शकतं.

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)च्या खात्यात सर्वाधिक १६.५ कोटी रक्कम शिल्लक आहे. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल या जोडीनं १३व्या पर्वात कमाल केली. रवी बिश्नोई, ख्रिस गेल, मोहम्मद शमी हे संघात कायम राहतील. ग्लेन मॅक्सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाकडे १०.१ कोटी रक्कम आहे. डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, केन विलियम्सन, टी नटराजन, जेसन होल्डर, जॉनी बेअरस्टो, भुवनेश्वर कुमार, हे कायम राहतील. मिचेल मार्श, सिद्धार्थ कौल यांना रिलिज केलं जाऊ शकतं.

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) कडे १४.७५ कोटी आहेत. यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये राहुल टेवाटिया व प्रियाम गर्ग हे ट्रम्प कार्ड ठरले. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, कार्तिक त्यागी, टॉम कुरन यांना कायम राखले जाईल. श्रेयस गोपाळ, वरुण अॅरोन, रॉबिन उथप्पा, जयजेव उनाडकट यांना रिलिज केले जाऊ शकते.