Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

एबी डिव्हिलियर्स ( Ab de Villiers) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore) हुकमी एक्का म्हणून एबीकडे पाहिले जाते. महागड्या खेळाडूंमध्ये तो 10व्या स्थानावर आहे. त्याच्यासाठी RCBने 11 कोटी मोजले आहेत.

सुरेश रैना ( Suresh Raina) - सुरेश रैनानं IPL 2020मधून माघार घेतली असली तरी सर्वाधिक महागड्या खेळाडूंमध्ये तो 9व्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) ने त्याच्यासाठी 11 कोटी मोजले आहेत.

बेन स्टोक्स ( Ben Stokes) - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्या भलत्याच फॉर्मात आहे. इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals ) हा खेळाडू 12.5 कोटी मानधन घेतो.

सुनील नरिन ( Sunil Narine ) - कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) चा हा खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) शाहरूख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळतो. त्रिनबागो नाइट रायडर्सनं CPL2020चे जेतेपद पटकावलं आणि त्यात नरिनचा महत्त्वाचा वाटा आहे.

स्टीव्हन स्मिथ ( Steven Smith ) - राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals )चा कर्णधार स्टीव्ह स्मिथ IPLच्या एका पर्वासाठी 12.5 कोटी घेतो.

डेव्हिड वॉर्नर ( David Warner) - ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाजासाठी सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) त्याच्यासाठी 12.5 कोटी मोजले आहेत. वॉर्नर या क्रमवारीत पाचव्या स्थानावर येतो.

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) - मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्मा ( Hitman) या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. त्याला 15 कोटी मानधन मिळतं... रोहितच्या नेतृत्वाखाली MIने चार ( 2013, 2015, 2017 आणि 2019) जेतेपदं पटकावली आहेत.

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार हा महागड्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार धोनीला ( MS Dhoni) 15 कोटी मानधन मिळतं.

पॅट कमिन्स ( Pat Cummins) - IPL Auction 2020त कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. आयपीएल लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.

विराट कोहली ( Virat Kohli) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली टॉप 10 महागड्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे. IPLच्या पहिल्या पर्वापासून RCBचा सदस्य असलेल्या विराटकडे 2013पासून संघाचे नेतृत्व आहे. त्याच्यासाठी RCBनं 17 कोटी मोजले आहेत.