IPL 2020 Final MI vs DC: रोहित शर्माची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी; आतापर्यंत या दोघांनाच जमला हा पराक्रम!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे.

DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आजचा हा सामना MIचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्यासाठीही खास आहे.

रोहितनं मैदानावर पाऊल ठेवताच एका विक्रमाला गवसणी घातली.

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यानंतर IPL मध्ये असा पराक्रम करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू आहे.

रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये ११ सामन्यांत २६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली आणि त्याला चार सामन्यांना मुकावे लागले.

रोहित शर्माचा आजचा २०० वा आयपीएल सामना आहे. केवळ महेंद्रसिंग धोनी २०० आयपीएल सामने खेळला आहे.

रोहितनं १९९ सामन्यांत ३१.०९च्या सरासरीनं ५१६२ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद १०९ ही सर्वोत्तम खेळी आहे

रोहितनं आयपीएलमध्ये ३८ अर्धशतकं व १ शतक आहे. त्याच्या नावावर ४५३ चौकार व २०९ षटकार आहेत.

रोहितच्या नावावर आयपीएलची ५ जेतेपदं आहेत. त्यापैकी ४ ही मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्यानं जिंकलेली आहेत.

महेंद्रसिंग धोनी ( २०४ सामने), रोहित शर्मा ( २००), दिनेश कार्तिक ( १९६), सुरेश रैना ( १९३), विराट कोहली ( १९२), रॉबीन उथप्पा ( १८९) व रवींद्र जडेजा ( १८४).

Read in English