IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं उठवलं विक्रमांचं वादळ

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 231 धावा चोपल्या. बेअरस्टोनं 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या, तर वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या.

16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा चोपल्या.

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादकडून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम नावावर केला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावा केल्या आणि शिखर धवन व केन विलियम्सन यांनी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केलेल्या दुसऱ्या विकेटसाठीचा 176 धावांचा विक्रम मोडला.

बेअरस्टोनं आयपीएलमधील पहिलेच शतक झळकावले. त्याने 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या.

वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. आयपीएलमधील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्याने शेन वॉटसन आणि विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात ख्रिस गेल 6 शतकांसह आघाडीवर आहे.

वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करून आयपीएलमध्ये विक्रम केला. त्यांनी गौतम गंभीर व ख्रिस लीन यांचा 2017सालचा 184* धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.

एकाच संघाकडून दोन शतकं होण्याची ही आयपीएलमधील दुसरी घटना आहे. याआधी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी 2016 मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध शतक झळकावले होते.