IPL 2018 : आयपीएलमध्ये कोणत्या प्रशिक्षकांनी किती कमावले, जाणून घ्या...

गॅरी कर्स्टन यांना बँगलोरच्या संघाने फलंदाजी प्रशिक्षकपद दिले होते. त्यासाठी त्यांना दीड करोड रुपये अवढे मानधन दिले होते.

भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा यावर्षी बँगलोरच्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात होता. नेहरा यावेळी गोलंदाजांना प्रशिक्षण देत होता. नेहराला प्रशिक्षणासाठी चार कोटी रुपये मोजले गेले होते.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला यावेळी दिल्लीच्या संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते, यासाठी त्याला 3.7 कोटी एवढे मानधन देण्यात आले.

लसिथ मलिंगाला मुंबईच्या संघाने गोलंदाजी प्रशिक्षकपद दिले होते. त्यासाठी मुंबईने मलिंगाला 1.5 कोटी एवढे मानधन दिले होते.

यंदा चेन्नईच्या संघाने आयपीएलमध्ये बाजी मारली. चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना 3.2 कोटी एवढे मानधन देण्यात आले आहे.

वीरेंद्र सेहवागकडे पंजाबच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते, त्यासाठी त्याला तीन कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले.

राजस्थानचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत होता तो ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न. राजस्थानने वॉर्नला प्रशिक्षकपदासाठी 2.7 कोटी रुपये दिले होते.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळआडू जॅक कॅलिसने कोलकाताच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते, त्यासाठी त्याला 2.5 कोटी रुपये मिळाले.

हैदराबादचा संघ यंदा उपविजेता ठरला होता. या संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी आणि व्हीव्हीएल लक्ष्मण यांना प्रत्येकी दोन कोटी एवढे मानधन देण्यात आले.