रवी शास्त्रींची 'टायटानिक' पोझ अन् नेटिझन्सने बनवलं बुजगावणं

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक डाव व 137 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 275, तर दुसरा डाव 189 धावांवर आटोपला. या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला कॅप्शन देण्यास सुचवले होते. त्यावरून नेटिझन्सने शास्त्रींची चांगलीच खिल्ली उडवली. पाहा भन्नाट मेम्स...