सात वर्षांच्या डेटिंगनंतर 'या' सुंदरीशी केले भारतीय क्रिकेटपटूने लग्न

भारताचा क्रिकेटपटू आणि या सुंदरीची ओळख २००६मध्ये झाली.

या दोघांमध्ये सात वर्षे अफेअर सुरु होते.

या सात वर्षांच्या अफेअरनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय २०१३ साली घेतला.

ही सुंदरी बॉलीवूडमधील कतरिना कैफसारखी दिसते असेही म्हटले जाते.

या सुंदरीचे बरेच ग्लॅमरस फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.

भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी आणि सुष्मिता रॉय यांची ही गोष्ट.

आज मनोजचा ३४वा वाढदिवस आहे.

मनोजचा जन्म १४ नोव्हेंबर १९८५ साली पश्चिम बंगाल येथील हावडा येथे झाला होता. त्यानंतर बंगलाकडून तो रणजी क्रिकेट खेळला. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्सचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारताकडून मनोज १५ सामने खेळला आहे.