भारतीय खेळाडूंची तिसऱ्या सामन्यापूर्वी फुल टू धमाल!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा व निर्णयाक सामना रविवारी कटक येथे होणार आहे. टीम इंडियाचे येथे पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आले.

बुधवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियानं बाजी मारून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.

पण, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. दीपक चहरने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्या जागी नवदीप सैनीची निवड करण्यात आली आहे. तरीही दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाचे मनोबल चांगलेच उंचावले आहे.

तिसऱ्या वन डे सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना तीन दिवसांचा ब्रेक मिळाला.

भारतीय खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलताना फुल टू धमाल केली.

कर्णधार विराट कोहलीनं सहकाऱ्यांसोबत धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.