India vs Pakistan : हिटमॅन रोहितचा पॉवरफुल शो; पाहा एका क्लिकवर!

भारत-पाक लढतील हिटमॅन रोहित शर्माची क्लासिक खेळी

रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने चोपल्या १४० धावा

लोकेश राहुलसह सलामीला १३६ धावांची विक्रमी भागीदारी

रोहितची खेळी ठरली ओल्ड ट्रॅफर्डवरील तिसरी सर्वोत्तम खेळी

सर व्हिव्ह रिचर्ड्स ( १८४, वि. इंग्लंड, १९८४) आणि ख्रिस ॲथे ( १४२*, वि. न्यूझीलंड, १९८६) यांच्यानंतर आता रोहितच..

इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय

रोहितने १८ डावांत हा पल्ला गाठला, तर शिखर धवनने १९ डावांत ही कामगिरी केली होती.

रोहितचे हे २४ वे वन डे शतक ठरले आणि या पल्ला गाठण्यासाठी सर्वात कमी डाव खेळलेला तो चौथा फलंदाज

हाशीम आमला ( १४२ डाव), विराट कोहली ( १६१ डाव) आणि एबी डिव्हिलियर्स ( १९२ डाव) आघाडीवर, पण सचिन तेंडुलकरला ( २१९ डाव ) टाकलं मागे

पाकिस्तानविरुद्ध वन डेत सलग दोन शतक झळकावणारा रोहित पहिलाच भारतीय. त्याने २०१८ च्या आशिया कपमध्ये १११ धावा चोपल्या

वन डेत सर्वात अधिक १५वेळा १२५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा रोहित दुसरा फलंदाज. सचिन तेंडुलकर (१९) आघाडीवर; पाकिस्तानविरुद्ध भारतीयाने केलेली पाचवी सर्वोत्तम खेळी. १८३ धावांसह विराट कोहली आघाडीवर