'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच

क्रिकेट, फूड आणि बॉलिवूड या तीन गोष्टी भारतीयांना खूप आवडतात. सध्या गुजरातमध्ये एका हॉटेलनं चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या नावानं खास डिश तयार केल्यात. संपूर्ण डिशला 'मोटेरा थाली' असं नाव दिलंय. त्यात नेमकं काय-काय आहे जाणून घेऊयात...

अहमदाबादमध्ये सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. येथील एका हॉटेलनं देखील क्रिकेटच्या प्रेमापोटी एक खास ५ फुटांच्या भव्य थाळीचा आपल्या मेन्यूमध्ये समावेश केला आहे. या थाळीला 'मोटेरा थाळी' असं नाव देण्यात आलं आहे.

'मोटेरा थाळी'त तुम्हाला 'धोनी खिचडी', 'कोहली खमन', 'भुवनेश्वर भरता', 'रोहित आलू रसीला', 'हरभजन हांडवो', 'बाऊन्सर बासुंदी', 'बुमहार भिंडी शिमलामिर्च', अशा हटके डीशचा समावेश आहे.

अहमदाबादच्या कोर्टयार्ड बाय मॅरियट हॉटेलमध्ये ही क्रिकेट स्पेशल डिश ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलनं 'मोटेरा चॅलेंज' देखील सुरू केलं आहे.

'मोटेरा चॅलेंज'मध्ये ग्राहकाला ५ फुटांची ही संपूर्ण डिश एका तासाच्या आत संपवायची आहे. यासाठी तो आपल्या कुटुंबीयांची देखील मदत घेऊ शकतो. एका तासात संपूर्ण डीश फस्त केल्यास विजेत्यास आकर्षक पारितोषिक देखील ठेवण्यात आलं आहे.

Read in English