India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा नवदीप सैनी दहावा खेळाडू, आधीची ९ नावं जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली.

तिसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली आणि अजिंक्यनं या सामन्यात नवदीप सैनीला ( Navdeep Saini) ला पदार्पणाची संधी दिली. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा तो दहावा खेळाडू ठरला.

अजिंक्यनं तीन वन डे, दोन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आहे. कर्णधारपदाच्या या कार्यकाळात दहा खेळाडूंनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं.

१० जुलै २०१५मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्यनं केलं होतं. त्या दौऱ्यावर टीम इंडियान तीन वन डे व दोन ट्वेंटी-20 सामने खेळले आणि ते जिंकलेही.

या दौऱ्यावर मनीष पांडेनं वन डे क्रिकेटमध्ये, तर केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा व संजू सॅमसन यांनी ट्वेंटी-20 संघातून पदार्पण केलं.

२०१७ धर्मशाला कसोटीत अजिंक्यनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व केलं आणि त्यातही विजय मिळवून दाखवला. या सामन्यात कुलदीप यादवनं पदार्पण केलं.

२०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्यकडे संघाची जबाबदारी सोपवली. त्यात दुखापतीचं ग्रहण टीम इंडियाच्या मानगुटीवर होतेच.

बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्यनं मोहम्मद सिराज व शुबमन गिल यांना पदार्पणाची संधी दिली आणि आता सिडनी कसोटीत नवदीप सैनीनं पदार्पण केलं.

अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं एकही कसोटी सामना गमावलेला नाही.