भारताला 'या' पाच खेळाडूंमुळे पत्करावा लागला लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुदधच्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेत Shardul Thakur ने भरपूर धावा दिल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलने पहिल्या वनडे सामन्यात ९ षटकांतमध्ये ८० धावा दिल्या. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शार्दुलने १० षटकांत ६० धावा दिल्या होत्या. आज झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात तर शार्दुलने ९.१ षटकांत ८७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड : चाहत्यांनी शार्दुलबरोबर आता तर Bumrah लादेखील ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बुमराह हा भारताचा गोलंदाज नसून न्यूझीलंडचा फलंदाज आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण न्यूझीलंडविरुदधच्या तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहला एकही बळी मिळवता आलेला नाही. बुमराहने तीन वनडे सामन्यांत ३० षटके टाकली. या ३० षटकांमध्ये त्याने एक षटक निर्धावही टाकले. पण या ३० षटकांमध्ये बुमराहने १६७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहने न्यूझीलंडला एक फलंदाज म्हणून मदत केली, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड : आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीने फक्त एकच अर्धशतक झळकावलेले आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोहलीला अजूनही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड : तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि विराट कोहली ( 9) स्वस्तात माघारी परतले. पृथ्वी शॉ फटकेबाजी करत होता, परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळनं त्याची विकेट पडली. पृथ्वी 42 चेंडूंत 40 धावा करून धावबाद झाला. पण भारताला या वनडे मालिकेमध्ये चांगली सलामी मिळाली नाही आणि त्याचा फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने दुसऱ्या वनडेमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या वनडेमध्ये मात्र त्याच्या गोलंदाजीवर जास्त धावा गेल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या वनडेमध्ये सैनीच्या आठ षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ६८ धावा लुटल्या.