World Cup Super League points table : टीम इंडियानं श्रीलंकेला सहज नमवलं; पण बांगलादेश, पाकिस्तान यांच्यापुढे जाता नाही आलं!

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं रविवारी यजमान श्रीलंकेवर विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पृथ्वी शॉ, इशान किशन, कर्णधार धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी हा श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पृथ्वीनं खणखणीत सुरूवात करत टीम इंडियाच्या धावा वादळाच्या वेगाइतक्या जलद वाढवल्या. त्यानंतर इशानने उरलेली कसर भरून काढली.

धवन संयमी खेळ करताना एका बाजूनं चौकार-षटकारांची आतषबाजी पाहत होता. सूर्यानं या विजयाला फिनिशिंग टच दिला. टीम इंडियानं विजय मिळवला असला तरी ICC Cricket World Cup Super League points table मध्ये त्यांना बांगलादेश व पाकिस्तान यांना मागे टाकता आले नाही.

''सहकाऱ्यांचा खेळ पाहून आनंद झाला. या खेळपट्टीवर फिरकीला साथ मिळेल हे माहित होतं अन् आमच्या फिरकी जोडीनं सामन्याला कलाटणी दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना नॉन स्ट्राईक एंडला राहून फटकेबाजी पाहण्यात आनंद येत होता. आयपीएलमध्ये हे युवा खेळाडू निर्भीडपणे खेळतात, त्याच आत्मविश्वासानं ते खेळले. पृथ्वी व इशान यांनी १५ षटकांतच निकाल लावला असता, अशा पद्धतीनं ते खेळत होते,''असे धवन म्हणाला.

दुसरीकडे शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशनं ३ विकेट्स राखून झिम्बाब्वेला दुसऱ्या वन डे सामन्यात नमवले अन् तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

झिम्बाब्वेनं ९ बाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात नाबाद ९६ धावा करताना विजय निश्चित केला. त्यानं दोन विकेट्सही घेतल्या. बांगलादेशनं या विजयासह ICC Cricket World Cup Super League points tableमध्ये ७० गुणांसह थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. इंग्लंड ९५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.