Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध सामना ड्रॉ झाल्यानंतर राहुल द्रविडनं घेतला मोठा निर्णय, सर्वांकडून कौतुक

Ind Vs NZ Kanpur Test : न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर राहुल द्रविडनं एक असा निर्णय घेतला, ज्याचं अनेकांनी कौतुक केलं.

Ind Vs NZ Kanpur Test Rahul Dravid: न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. परंतु या सामन्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं एक मोठा निर्णय घेतला. त्याच्या मोठ्या निर्णयाचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात येत आहे.

राहुल द्रविडनं शिव कुमार यांच्या नेतृत्वाखालील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममधील उत्तम पिच तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली. राहुल द्रविडनं आमच्या मैदानावरील कर्मचाऱ्यांना व्यक्तीगतरित्या ३५ हजार रूपयांची रक्कम दिली, याची आम्ही अधिकृत घोषणा करू इच्छितो, असं उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं (UPCA) सामन्यानंतर सांगितलं.

पहिल्या सामन्यात भारतीय वंशाच्या एजाज पटेल आणि रचिन रविंद्र यांनी सोमवारी ग्रीन पार्क स्टेटियममध्ये उत्तम खेळ करत भारतीय संघाच्या हातचा विजय रोखून ठेवला. तसंच त्यांच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

त्याच्या काळात द्रविड त्याच्या चांगल्या खेळासाठी ओळखला जात होता. ग्राउंडमनला मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम हे या वस्तुस्थितीचे प्रतीक होते की सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाजांसाठी काहीतरी चांगले होते.

या खेळपट्टीवर जिथे श्रेयस अय्यर, शुबमन गिल, टॉम लॅथम आणि विल यंग सारख्या फलंदाजांनी उत्कृष्ट टेक्निक दाखवून धावा केल्या, तिथे टीम साऊथी आणि काइल जेमिसनसारख्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणलं होतं. खेळपट्टीनेही भारतीय फिरकीपटूंना मदत केली.

सामन्यानंतर राहुल द्रविड यानं फिरकीपटू आर अश्विन हा मॅच विनर असल्याचं म्हटलं. तसंच कसोटी सामन्यात देशातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरल्याची बाब ही अतिशय खास असल्याचंही म्हटलं.

अश्विननं न्यूझीलंड विरोधात पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी टॉम लाथमची विकेट घेट आपली ४१८ वी टेस्ट विकेट घेतली. त्याच्या या विकेटनंतर त्यानं भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगलाही मागे टाकलं.

आता तो अनिल कुंबळे (६१९) आणि कपिल देव (४३४) यांच्या मागे आहे. द्रविडनं अश्विनच्या या कामगिरीचं सामन्यानंतर कौतुक केलं. "ही एक उत्तम कामगिरी आहे, असं मला वाटतं. हरभजन हा एक उत्तम गोलंदाज होता हे सर्वज जाणतात, त्याच्यासोबतही मी खुप क्रिकेट खेळलोय. अश्विननं केवळ ८० सामन्याच त्याच्या पुढे ही महत्त्वाची बाब आहे," असं द्रविड सामन्यानंतर म्हणाला.

भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. राचिन रविंद्रनं ९१ चेंडू म्हणजे जवळपास १५ षटकं खेळून काढताना किवींचा पराभव टाळला अन् टीम इंडियाला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. राचिन व अजाझ पटेल यांनी ५२ चेंडू खेळून काढताना टीम इंडियाला शेवटची विकेट घेऊ दिली नाही.

पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल ( Axar Patel) यानं पहिल्या डावात किवींना दणका दिला, वृद्धीमान सहा (Wridhiman Saha) वेदनेसह खेळला अन् अर्धशतक झळकावून संघाच्या खात्यात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या.

आर अश्विन ( R Ashwin) यानं अष्टपैलू कामगिरी केली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दुसऱ्या डावात सामन्याला कलाटणी दिली. पण, भारताला विजय मिळवता आला नाही.

भारतीय खेळाडूंनी चौथा दिवस गाजवला. ५ बाद ५१ धावांवरून टीम इंडियानं ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. परंतु अखेरच्या सत्रात भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंनी उत्तम खेळी करत भारताला विजयापासून दूर ठेवलं आणि सामना अनिर्णीत राहिला.