IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलनं मोडले अनेक विक्रम, अनेक दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं ( Axar Patel) धक्का दिला. त्यानं डावात पाच विकेट्स घेत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

अक्षरनं आजच्या सामन्यात ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ५ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याच्या कायले जेमिन्सनच्या विक्रमाशी अक्षरनं बरोबरी केली.

अक्षरनं अवघ्या ७ डावांमध्ये पाचवेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानं चार्ली टर्नर ( १८८७-८८) व टॉम रिचर्डसन ( १८९३-९५) यांच्यांशी बरोबरी केली.

कारकिर्दीच्या पहिल्या चार कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अक्षरनं दुसरं स्थान पटकावताना आर अश्विनला मागे टाकले. नरेंद्र हिरवानी ३६ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. अक्षरनं ३२* विकेट्स, तर अश्विननं २६ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी कारकिर्दीच्या पदार्पणाच्या वर्षात डावात पाच विकेट्स सर्वाधिक वेळा घेण्याच्या विक्रमात अक्षरनं रॉडनी हॉज यांच्या ( १९७८) विक्रमाशी बरोबरी केली. हॉज यांनी तीन कसोटींत हा पराक्रम केला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सलग ४+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अक्षरनं तिसरे स्थान पटकावले. मुथय्या मुरलीधरन व वकार युनिस यांनी सलग ९ वेळा हा पराक्रम केला, त्यानंतर चार्ली टर्नर ( ८), जॉनी ब्रिज्स/अक्षर ( ६) यांचा क्रमांक येतो.

भारताच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात किवींचा डाव २९६ धावांवर गुंडाळला. भारतानं पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली.