ICC World Cup 2019 : हे आहेत विश्वचषकातील पाच निर्णायक क्षण

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बोन स्टोकच्या बॅटला चेंडू लागून एक ओव्हर थ्रो गेला. या ओव्हर थ्रोमुळे इंग्लंडला सहा धावा मिळाल्या. हा विश्वचषकातील क्षण कोणीही विसरू शकत नाही.

भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीवर अखेर भारताची मदार होती. पण न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने थेट फेकीने धोनीला धाव बाद केले. हा क्षण कुणीही विसरू शकणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच हा विश्वचषकात चांगल्या फॉर्मात होता. पण त्याला दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ज्यापद्धतीने बाद केले, ते अविस्मरणीय असेच होते.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय हा संघासाठी सुदैवी ठरला. कारण तो जेव्हा संघात नव्हता तेव्हा इंग्लंडचा संघ पराभूत होत होता. पण रॉय संघात आल्यावर मात्र इंग्लंडने एकामागून एक विजय मिळवायला सुरुवात केली. रॉय संघात आल्यावर त्याच्या जॉनी बेअरस्टोवबरोबर चांगल्या भागीदाऱ्याही रंगल्या.

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. या सामन्यात 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची 7 बाद 164 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कार्लोस ब्रेथवेटचे वादळ मैदानात घोंघावले. वेस्ट इंडिज ब्रेथवेटच्या खेळीमुळे जिंकणार, असे वाटत होते. पण त्यानंतर मात्र न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने ब्रेथवेटला बाद करत संघाला सामना जिंकवून दिला होता.