टीम इंडियाकडून कसा निसटला विश्वचषक, पाहा एका क्लिकवर

ध्रुव जुरेल आणि अथर्व अंकोलेकर यांनी धाव घेताना एकाच दिशेने रनप केला अन् जुरेल बाद झाल्याने टीम इंडियाला फटका बसला

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020, युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशने भारतावर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या.

बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले.

या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. भारताने या सामन्यात तब्बल २९ अवांतर धावा बांगलादेशला आंदण दिल्या.

भारताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती.

न्यूझीलंड येथे सिनियर टीम इंडियानेही अंडर 19 विश्वचषक 2020 स्पर्धेचा सामना एकत्रितपणे पाहिला, पण भारताला निराशा पत्करावी लागली.

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात काही काळ पावसाचा खेळ पाहायला मिळाला, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार अंतिम टप्प्यात खेळविण्यात आलं.

भारताची वाटचाल पराभवाच्या दिशेने असताना यशस्वी जैसस्वालने देवाचा धावा करत वरुणराजाला साकडे घातले तो क्षण, यशस्वीने महत्वपूर्ण खेळी करत 88 धावा करत 1 गडीही बाद केला होता.

टीम इंडियाच्या पराभवाचं दु:ख वाटणार नाही तो भारतीय कसला, सामन्याच्या शेवटच्या क्षणी डोळ्यात अश्रू तरळलेला भारतीय