IPL 2018: जाणून घ्या भारतीय क्रिकेटपटूंची बीसीसीआय आणि आयपीएलमधून होणारी कमाई

बीसीसीआयनं ऑक्टोबर 2017 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं चार गटात वर्गीकरण केलं. यानुसार ए प्लस गटातील खेळाडूंना वर्षाकाठी प्रत्येकी 7 कोटी, ए गटातील खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी, बी गटातील खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी तर सी गटातील खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातात. मात्र अनेक खेळाडू दोन महिने आयपीएल खेळून त्यापेक्षा जास्त कमाई करतात. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून 7 कोटी तर आयपीएलमधून 17 कोटी रुपये मिळतात.

रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाकाठी 7 कोटी रुपये मिळतात. तर मुंबई इंडियन्सकडून 15 कोटी रुपयांची रक्कम मिळते.

महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये मिळतात. चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीला आयपीएल खेळण्यासाठी 15 कोटी रुपये मिळतात.

ए प्लस गटातील शिखर धवनला बीसीसीआयकडून 7 कोटींचं मानधन मिळतं. तर हैदराबादच्या संघानं त्याच्यासाठी 5.2 कोटी रुपये मोजले आहेत.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयकडून 7 कोटी मिळतात. तर सनरायजर्स हैदराबादकडून खेळण्यासाठी त्याला 8.2 कोटी रुपये मिळतात.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सकडून प्रत्येकी 7 कोटी रुपये मिळतात.

फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला बीसीसीआयकडून यंदाच्या वर्षात 5 कोटी मिळाले आहेत. तर किंग्स इलेव्हननं त्याला 7.6 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे.

फिरकीपटू रवींद्र जाडेजाला बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये मिळतात. तर चेन्नईच्या संघानं त्याच्यासाठी 7 कोटी रुपये मोजले आहेत.

फलंदाज अजिंक्य रहाणेला बीसीसीआय वर्षाकाठी 5 कोटींचं मानधन दिलं जातं. राजस्थानच्या संघाकडून खेळण्यासाठी रहाणेला 4 कोटी रुपये मिळतात.