बाबाss लगीन... हार्दिक पांड्याची पुन्हा 'विकेट'; बॉलिवूड नायिकेनंच केलं 'बोल्ड'

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या विश्रांतीवर आहे. पण, महागडी गाडी, रॅम्प वॉक आदी कारणाने त्याची चर्चा सुरूच आहे. आता तर त्याचं नाव आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. गोष्ट इथेच थांबत नाही, तर या अभिनेत्रीसोबतचं नातं इतकं सीरियस आहे की हार्दिकनं चक्क घरच्यांशी तिची ओळख करून दिली आहे.

नताशा स्टॅनकोव्हिक असे या अभिनेत्रीचे नाव आहे. याआधीही हार्दिकचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं, परंतु हे प्रकरण थोडं गंभीर आहे. हार्दिक नताशाला डेट करत असल्याचीही चर्चा आहे.

गेल्या आठवड्यात हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टित तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टित तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली.

या पार्टित हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. या पार्टित हार्दिकनं नताशाची ओळख त्याचा गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी करून दिली.

मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.

तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता. एली गोनी आणि प्रियांक शर्मा यांच्याशीही नताशाचे नाव जोडले गेले आहे.

यापूर्वी हार्दिकचे नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौलेताशी जोडले गेले आहे.