हार्दिक पांड्याचं फोटोशूट अन् चर्चा रंगतेय १.६५ कोटींच्या घड्याळाची, See Photo!

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील मध्यंतरानंतर मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) १० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. आजपासून IPL2020चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू नव्या उत्साहानं मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या कामगिरीत हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) अजूनही अपेक्षित फटकेबाजी करताना पाहायला मिळाला नाही. त्यानं ७ सामन्यांत १३५ धावा केल्या आहेत आणि नाबाद ३० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं अजून एकही षटक टाकलेलं नाही.

पण, आज हार्दिक पांड्याची एका वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली आहे. त्यानं नुकतंच एक फोटोशूट केलं, पण ही चर्चा त्याच्या फोटोशूटची नसून त्याच्या हातावर दिसणाऱ्या घड्याळाची आहे.

Patek Philippe Nautilus या कंपनीचं घड्याळ हार्दिकच्या मनगटावर दिसत आहे आणि त्याची किंमत १.६५ कोटी इतकी आहे.