आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टीव्ह असतो. यावेळी मात्र भज्जीने मुंबईतील अपल्या घराच्या वीज बिलासंदर्भात ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

हरभजन सिंगने ट्विट करत, 'एवढं बील. संपूर्ण कॉलनीचं लवलं का? नॉर्मल बिलापेक्षा 7 पट अधिक??? व्वा.' असं लिहिलं आहे.

हरभजन सिंगने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मुंबईतील घराचे वीज बील तब्बल 33,900 रुपये एवढे आले आहे. यावर त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिकांच्या घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर वाढून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिकांच्या घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर वाढून येत आहे.

हरभजन सिंगपूर्वी अनेक सेलेब्रिटीजनी आपल्या घराच्या वीज बिलासंदर्भात सोशल मीडियावरून वीज वितरण कंपन्यांवर निशाणा साधला आहे.

हरभजन सिंगने भारतीय क्रिकेट संघाकडून 103 कसोटी सामने खेलले आहेत. यात त्यांने तब्बल 417 बळी घेतले आहेत.

गेल्या 2016 पासून हरभजन सिंग म्हणजेच भज्जी भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाही.

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप आईसीसीने स्थगित केला आहे. यामुळे आयपीएल 13चा रस्ता मोकळा झाला आहे.

यामुळे आता लवकच हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी आपल्या गोलंदाजीची जादू दाखवताना दिसेल.