Happy Birthday : युवराजची फिल्मी स्टाईल Love Story!

सिक्सर किंग युवराज सिंग मैदानाबरोबर ग्लॅमरच्या दुनियेतही चांगलाच प्रसिद्ध होता.

युवराज बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्येही चांगलाच रमलेला पाहायला मिळतो.

युवराजची पत्नी हेझल किच ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.

युवराज आणि हेझल यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर युवराजने हेझलला कॉफी पिण्यासाठी आमंत्रण दिले होते.

हेझल जेव्हा कॉफी प्यायला येत होती तेव्हा तिने आपला फोन बंद केला होता. हेझलची ही सवय पाहून युवराजने तिचा नंबर डिलीट केला होता.

युवराज आणि हेझल यांच्या फेसबूकमध्ये एक मुलगा कॉमन मित्र होता. युवराजने हेझलला त्याच्यापासून लांब राहायला सांगितले होते.

युवराजला हेझलवर प्रेम जडले होते. युवराजने हेझलला प्रपोज केले. पण हेझलने युवराजला उत्तर द्यायला तीन वर्षे लावली. युवराजला होकार दिल्यानंतर हेझल एक वर्ष त्याला भेटली नव्हती.

युवराजला बऱ्याच मुली भेटतात, त्याच्या जवळ येतात. पण युवराज त्यांच्याशी कसा वागतो, हे मी नेहमीच पाहत असते, असे हेझल म्हणते.

युवराजने जेव्हा मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, तेव्हा मी त्याबाबत गंभीर नव्हते, असेही हेझल म्हणाली होती.

आज युवराजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची ही लव्ह स्टोरी पुढे आली आहे.