Happy Anniversary: बॉलिवूड चित्रपटासारखी आहे अजिंक्य रहाणेची Love Story!

भारतीय संघाचा Mr. Dependable अजिंक्य रहाणेच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस.

अजिंक्य आणि राधिका धोपावकर यांची Love Story एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी आहे.

अजिंक्य आणि राधिका हे शाळेतील मित्र...

ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली.

याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले.

या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला. अजिंक्य-राधिकाच्या लग्नाला अनेक क्रिकेटपटू आले होते.