खेळाडूंची स्टाइलही विसरशील भावा, त्यांच्या भू-भूंचा रुबाब काय वर्णावा!

जर तुम्ही महेंद्रसिंग धोनीला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल, तर त्याच्या पाळीव प्राण्यांची तुम्हाला चांगलीच माहिती असेल. जगभरातील नावाजलेले खेळाडू त्यांच्या पाळीव प्राण्यांची किती काळजी घेतात याबद्दल आपण सातत्याने सोशल मीडियावरून जाणून घेत असतोच... या खेळाडूंच्या रॉयल लाईफ प्रमाणेच त्यांच्या पाळीव प्राण्यांचाही थाट राजेशाही असतो. अशीच राजेशाही थाट असलेल्या पाळीव प्राण्यांबद्दल जाणूया...

कोको चॅनेल कार्तिक : भारतीय संघाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल यांचा कोका चॅनेल कार्तिक हा कुत्रा. लॅब्रेडॉडल प्रजातीतील या कुत्र्याचा वाढदिवसही दणक्यात साजरा होतो. दिवाळीत त्याला छान छान ड्रेसही घातले जातात. इतकेच काय तर त्याचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंट आहे.

पिएर आणि टेस्ला : टेनिस स्टार नोव्हाक जोकोव्हीच आणि त्याची पत्नी जेलेना जोकोव्हीच यांनी दोन कुत्रे पाळले आहेत. पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याचं नाव पिएर आणि चॉकलेटी रंगाच्या कुत्र्याचं नाव टेस्ला असे आहे. हे दोघंही जोकोव्हीच कुटुंबीयांचे सदस्यच आहेत.

रुबेन व माईली : मँचेस्टर युनायटेड व इंग्लंडचा फुटबॉलपटू ख्रिस स्मॉलिंग आणि त्याची पत्नी सॅम कून यांनी कॉकर स्पॅनिएल व जॅक रसल प्रजातिचे कुत्रे पाळले आहेत. दोघांचे नाव अनुक्रमे रुबेन व माईली असे आहे.

लुई बोल्ट : न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट व त्याची पत्नी गॅर्टी स्मिथ यांच्याकडेही क्युट कुत्रा आहे. लुई असे त्याचे नाव असून तो ट्रेंट व गॅर्टीसह भटकंती करतो.

भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुल याच्याकडेही सिम्बा नावाचा पपी आहे

फॉर्म्युला वन स्टार लुईस हॅमिल्टनकडे दोन बुलडॉग आहेत. रोस्को व कोको असे त्यांची नावं आहेत

दिग्गज फुटबॉलपटू डेव्हीड बेखम याच्याकडेही कॉकर स्पॅनिएल प्रजातिचा ऑलिव्ह नावाचा कुत्रा आहे.