इंग्लंडचे असे कर्णधार जे त्यांच्या देशाचे नव्हतेच

नासीर हुसेन : नासीर हुसेन हे इंग्लंडचे कर्णधार होते. हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने चांगली कामगिरी केली होती. पण हुसेन यांचे वडिल भारतीय होते.

अॅडम होलिओक : अॅडमनेही इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले होते. १९९७ साली माइक आर्थरटन यांच्याकडून अॅडमकडे संघाचे नेतृत्व आले होते. पण अॅडमचा जन्म हा ऑस्ट्रेलियामधील आहे.

केव्हीन पीटरसन : धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार अशी ओळख केव्हीन पीटरसनची होती. पण पीटरसनचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता आणि तिथेच त्याने क्रिकेटचे धडेही गिरवले होते.

अॅण्ड्र्यू स्ट्रॉस : इंग्लंडचे कर्णधारपद यशस्वीरीत्या भुषवले होते ते अॅण्ड्र्यू स्ट्रॉसने. सध्याच्या घडीला अॅण्ड्र्यू स्ट्रॉस हा इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाचा संचालक आहे. पण अॅण्ड्र्यू स्ट्रॉसचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेत झाला आहे.

इऑन मॉर्गन : इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून दिला तो इऑन मॉर्गनने. पण मॉर्गन हा इंग्लंडचा नागरीक नाही. मॉर्गन हा मुळचा आयर्लंडचा होता. पण त्याने आपले नागरीकत्व बदलून घेतले आणि तो इंग्लंडचा कर्णधार झाला.