CSK vs KXIP : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांची पराक्रमी भागीदारी; मोडला सचिन तेंडुलकरचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम!

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघाला रविवारी चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) सहज पराभूत केले. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी सुरुवातही तशीच करून दिली. पंजाबनं CSKसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

आजचा दिवस CSKचा ठरला. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला.

लोकेश राहुल ( ६३), मयांक अग्रवाल ( २६), मनदीप सिंग ( २७) निकोलस पूरन ( ३३) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी.

फॉर्माशी झगडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच. आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला.

या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. वॉटसन ५३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावांवर नाबाद राहीला. चेन्नईनं १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या.

आयपीएलमधील ही सलामीवीरांची चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. या विक्रमात जॉनी बेअरस्टो/डेव्हिड वॉर्नर ( १८५ वि. RCB, २०१९), गौतम गंभीर/ख्रिस लीन ( १८४* वि. GL, २०१७) आणि लोकेश राहुल/मयांक अग्रवाल ( १८३ वि. RR, २०२०) या जोड्या आघाडीवर आहेत.

चेन्नईनं दुसऱ्यांना पंजाबवर १० विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यापूर्वी २०१३ साली त्यांनी हा पराक्रम केला होता. एकाच संघाला दोन वेळा १० विकेट्स राखून पराभूत करणारा CSKहा चौथा संघ ठऱला आहे. केनिया ( वि. स्कॉटलंड), ग्लॅमोर्गन ( वि. ग्लोऊस) आणि लँकशायर ( वि. डर्बीशायर) यांनी हा पराक्रम केला आहे.

IPL मध्ये एकही विकेट न गमावता धावांचा पाठलाग करणारा हा दुसरा मोठा विजय आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं २०१७ मध्ये गुजरात लायन्सने १८४ धावांचे लक्ष्य १० विकेट्स राखून पार केले होते.

१० विकेट्स राखून विजय मिळवणारी ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. यातही गौतम गंभीर/ख्रिस लीन ( १८४* वि. GL, २०१७) हे आघाडीवर आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर/ड्वेन स्मिथ ( १६३ वि. RR, २०१२) आणि अॅडम गिलख्रिस्ट/व्हीव्हीएस लक्ष्मण ( १५५ वि. MI, २००८) यांचा क्रमांक येतो.