Abhinav Bindra : बबलमध्ये राहून क्रिकेटपटू आंधळ्या-बहिऱ्यांसारखे वागू शकत नाही; अभिनव बिंद्रानं IPLवर साधला निशाणा

ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नेमबाद अभिनव बिंद्रा ( Abhinav Bindra) यानं क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. भारत कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे आणि अशा परिस्थितीत आयपीएल खेळवली जात आहे, यावर नाराजी व्यक्त करताना बिंद्रानं बीसीसीआयचेही कान टोचले.

क्रिकेटपटूंनी एवढं तरी जबाबदार असायला हवं की त्यांनी आयपीएलदरम्यान कोरोना बाबत जनजागृती करावी आणि स्वतःचं योगदान द्यावं. सध्यपरिस्थितीत खेळाडूंनी स्वतःच्या आजूबाजूलाही पाहायला हवं. बिंद्रानं इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममधून क्रिकेटपटूंचे कान टोचले.

तो म्हणाला,''अनेक खेळाडूंनी बरंच काही अचिव्ह केलं असतं आणि ते त्यांच्या खेळाचे नायक असतात. पण, उपयोग काय, जर आपण कोणाचं जीवन वाचवत नसू. आपण ज्या उंचीवर आहोत, त्यानुसार वागायला हवं. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, याचं भान राखायला हवं. फ्रंटलाईन कर्मचारी किती लोकांचे जीव वाचवत आहेत. ते खरे नायक आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळाली तर जे काही करू शकतो ते करायला हवं.''

बिंद्रानं लिहिलं की,''मला आयपीएलचा उल्लेख करावासा वाटतो आणि त्याच्यावरून सुरू असलेल्या चर्चा योग्य आहेत की अयोग्य, यावरही विचार करायला हवा. ही लोकं लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत का? माझं वैयक्तिक मत विचाराल तर आता कोणताच खेळ पाहण्याच्या मनस्थितीत मी नाही. ट्विटवर आयपीएलची बातमी दिसताच मी ती उडवून टाकतो. हे माझं मत आहे. याची सकारात्मक बाजूही असू शकते. सद्यस्थितीत प्रचंड नकारात्मकता आहे. व्यक्ती आणि देश म्हणून आपल्याला पुढे जात राहण्यासाठी कोणत्यातरी गोष्टीची गरज आहे.''

बिजिंग ऑलिम्पिक २००८मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या बिंद्रानं पुढे लिहिले की,''मी बीसीसीआयचा अध्यक्ष असतो आणि माझ्यात तेवढी क्षमता असती तर मी आयपीएलमधून येणाऱ्या उत्पन्नाचा अधिकाधिक भाग हा चॅरिटी म्हणून व्हॅक्सिनेशन किंवा अन्य मदतीसाठी दान केला असता.''

क्रिकेटपटू व अधिका आपल्या जगात मस्त राहू शकत नाहीत. त्यानं लिहिलं की,''क्रिकेटपटू व अधिकारी यांनी स्वतःचं बायो बबल तयार केलं आहे. याचा अर्थ त्यांना बाहेर काय चाललंय हे दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, असा होत नाही. तुम्ही जेव्हा आयपीएलचा सामना खेळत असता तेव्हा स्टेडियमबाहेर अॅम्बुलन्स कोणालातरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. तुमच्या सेलिब्रेशन व अन्य गोष्टींवर थोडा अंकुश असायला हवा, किमान समाजाप्रती असलेलं आदर दाखवण्यासाठी तुम्ही ते करू शकता.''

भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहून आयपीएलमधून परदेशी खेळाडूंच्या माघारीचे सत्रही सुरूच आहे. RCBचा अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी माघार घेतली, तर राजस्थान रॉयल्सच्या लायम लिव्हिंगस्टोन व अँड्य्रू टाय यांनीही बायो बललला कंटाळून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर अश्विन याच्या कुटुंबीयांना कोरोना झाल्यानं त्यानंही आयपीएलमधून माघार घेतली आहे.

Read in English