ख्रिस गेलच IPLमधील 'सिक्सर किंग', इतर कुणी आसपासही नाही

किंग्स इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 300 षटकार खेचण्याचा पराक्रम शनिवारी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन षटकार खेचताच षटकारांचे त्रिशतक साजरे केले. गेलने 115 सामन्यांत 302 षटकार खेचले आहेत आणि त्याच्या या विक्रमाच्या आसपासही कुणी नाही.

आयपीएलमध्ये सर्वात अधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 143 सामन्यांत 192 षटकार मारले आहेत

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 177 सामन्यांत 187 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाने 178 सामन्यांत 186 षटकार खेचले आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 176 सामन्यांत 185 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर 165 सामन्यांत 178 षटकार आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरनं 116 सामन्यांत 165 षटकार लगावले आहेत.

चेन्नई सुपर किंग्सच्या शेन वॉटसनने 119 सामन्यांत 160 षटकारांची आतषबाजी केली आहे.

सनरायझर्स हैदराबादचा युसूफ पठाण 166 सामन्यांत 158 षटकारांसह नवव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड या क्रमवारीत दहाव्या स्थानावर येतो. त्यानं 135 सामन्यांत 155 षटकार खेचले आहेत.