IPL 2020 : चेन्नईचा 'स्वस्त' शिलेदार करतोय 'चमत्कार'; 'सुपर कमाई'वाले भिडू रणांगणात पडलेत गार!

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) कामगिरी ही आतापर्यंत निराशाजनक झालेली आहे. सहा सामन्यांत त्यांना केवळ दोनच विजय मिळवता आलेले आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या सामन्यात CSKची गाडी रुळावर आली असे वाटले होते, पण पुढच्याच सामन्यात KKRविरुद्ध त्यांनी हातचा सामना गमावला.

त्यामुळे यंदा CSK प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यात CSKने आपल्या खेळाडूंसाठी तगडी रक्कम मोजली आहे आणि त्या तुलनेत त्यांची कामगिरी सुमार झाली आहे.

याउलट सर्वात स्वस्त असलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis) सर्वाधिक कमी रक्कम घेऊनही सुपर कामगिरी करून दाखवली आहे.

महेंद्रिसंग धोनी - 15 कोटी : 6 सामने, 102 धावा, 47* सर्वोत्तम, 51 सरासरी, 10 झेल व 1 स्टम्पिंग

केदार जाधव - 7.8 कोटी : 6 सामने, 58 धावा, 26 सर्वोत्तम, 18 सरासरी, 1 झेल

रवींद्र जडेजा - 7 कोटी : 6 सामने, 94 धावा, 50 सर्वोत्तम, 35.33 सरासरी, 2 झेल

पीयूष चावला - 6.75 कोटी : 5 सामने, 6 विकेट्स, 8.88 इकॉनॉमी, 2/33 सर्वोत्तम

ड्वेन ब्राव्हो - 6.4 कोटी : 3 सामने, 3 विकेट्स, 8.58 इकॉनॉमी, 3/37 सर्वोत्तम

सॅम कूरन - 5.5 कोटी : 6 सामने, 68 धावा, 4 झेल, 7 विकेट्स, 3/33 सर्वोत्तम

कर्ण शर्मा - 5 कोटी : 1 सामना, 2 विकेट्स, 6.25 इकॉनॉमी, 2/25 सर्वोत्तम

शेन वॉटसन - 4 कोटी : 6 सामने, 185 धावा, 83* सर्वोत्तम, 37 सरासरी, 2 झेल

शार्दूल ठाकूर - 2.6 कोटी : 3 सामने, 5 विकेट्स, 8.25 इकॉनॉमी, 2/28 सर्वोत्तम

अंबाती रायुडू - 2.2 कोटी : 4 सामने, 109 धावा, 71 सर्वोत्तम, 36.33 सरासरी, 1 झेल

मुरली विजय - 2 कोटी : 3 सामने, 32 धावा, 21 सर्वोत्तम, 10.66 सरासरी

फॅफ ड्यू प्लेसिस - 1.6 कोटी : 6 सामने, 299 धावा, 87* सर्वोत्तम, 74.75 सरासरी, 7 झेल