'कॅप्टन कूल' धोनीलाही राग येतो!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जातो. पण, धोनीलाही राग येतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. नुकत्याच एका सामन्यात धोनी नवोदित खेळाडू खलील अहमदवर भडकला होता. इतकेच नव्हे तर त्याने शिवीही हासडली होती. धोनी भडकल्याच्या अशाच काही घटना पाहूया...

ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धोनी खलील अहमदवर भडकला होता. ड्रिंक्स ब्रेकमध्ये खलील धोनी आणि दिनेश कार्तिकसाठी पाणी घेवून आला होता. मात्र, तो खेळपट्टीवरून धावत गेला आणि धोनीने त्याच्यासाठी शिवी हासडली.

2018च्या आशिया चषक स्पर्धेत धोनीने एका सामन्यात नेतृत्व केले. कर्णधार म्हणून धोनीचा तो 200 वा सामना होता. त्या सामन्यात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणात बदल केला. त्याच्या या बदलाशी धोनी सहमत झाला नाही आणि त्याने कुलदीपला बॉलिंग करणार की गोलंदाज बदलू, असा दमच भरला.

अशाच एका सामन्यात कुलदीप गोलंदाजी करत होता आणि पुन्हा त्याने क्षेत्ररक्षणात बदल केले. त्यानंतर धोनी यष्टिमागून ओरडला की,'' मी तूला वेडा दिसतो, 300 सामन्यांचा अनुभव कोणाकडे आहे?''

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात धोनी आणि मनिष पांडे खेळपट्टीवर होते. मनिष नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि त्यावेळी धोनी त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी मनिषचे लक्ष दुसरीकडेच होते. तेव्हा धोनीचा पारा चढला. इकडे-तिकडे काय पाहतोस, माझ्याकडे पाहा.

2015साली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मुस्ताफिजुर रहमानने भारतीय खेळाडूंना सतावले होते. मात्र, एका सामन्यात धोनीनं त्याची चांगलीच धुलाई केली होती. धाव घेताना मुस्ताफिजुर धोनीच्या मध्ये आला आणि तेव्हा धोनीने त्याला धक्का दिला होता. त्या घटनेनंतर दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

2011-12च्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत तिसऱ्या पंचांनी माइक हसीला बाद दिले होते. मात्र, मैदानावरील पंचांनी हसीला परत बोलवले. त्यावर नाराजी व्यक्त करताना धोनीने पंचांशी हुज्जत घातली.

आयपीएलमधील एका सामन्यात झेल टिपल्यानंतर चेंडू जमिनीवर जोरात आपटला होता. गोलंदाज व्यवस्थित गोलंदाजी करत नसल्याने धोनी नाराज होता आणि त्याने तो अशा पद्धतीने व्यक्त केला.

धोनीच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटात मुख्य भुमिका करणाऱ्या सुशांत राजपूतलाही धोनीच्या रागाचा सामना करावा लागला होता. एकच प्रश्न सतत विचारल्यामुळे धोनी रागावला होता.