#BestOf2018 : क्रिकेट चाहत्यांना याड लावणारे हे 'झिंगाट' क्षण!

बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून भारतीय संघ 2018चा निरोप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. या कसोटीत भारताचा विजय जवळपास पक्काच आहे. हे वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी भरभरून आनंद देणारे ठरले. विराट कोहलीच्या विक्रमांच्या एव्हरेस्टची उंची वर्षानुवर्ष वाढतच चालली आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी नव्हे, तर अन्य क्रिकेटपटूंनीही अशा याड लावणाऱ्या खेळी करून चाहत्यांना झिंगाट क्षण अनुभवण्याची संधी दिली. चला तर मग या झिंगाट क्षणांच्या आठवणीत रमूया...

न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 11 तास , 489 चेंडूंचा सामना करताना 264 धावांची केलेली नाबाद खेळी श्रीलंकेचे चाहते कधीच विसरणार नाहीत.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीत 153 धावांची अविस्मरणीय खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने डरबन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 143 धावा चोपल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 158 धावांची खेळी करून दिमुथ करुणारत्नेने श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

चेतेश्वर पुजाराची अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची 123 धावांची क्लासिक खेळी

पृथ्वी शॉचे पदार्पणाच्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या 134 धावा

आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनच्या पाकिस्तानविरुद्ध 118 धावा

बांगलादेशच्या मुश्फीकर रहिमच्या झिम्बाब्वेविरुद्ध नाबाल 219 धावा.

कुशल मेंडिस 141* ( श्रीलंका) विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन

अँजेलो मॅथ्यूज 120* ( श्रीलंका) विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन

अॅलेस्टर कुक 147 ( इंग्लंड) विरुद्ध भारत, ओव्हल