#Best Of 2018 : भारतीय गोलंदाजांपेक्षा अफगाणिस्तानचा खेळाडू भारी!

भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने फारसे फलदायी राहिले नाही. मात्र, वन डे क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदासह भारताने 2018 मध्ये 20 वन डे सामन्यांत 14 विजय मिळवले. तर केवळ चार सामने पराभूत झाले. गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली आहे. पण, 2018 मध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने भारतीय खेळाडूंनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

रशीद खान ( अफगाणिस्तान) 20 सामने 48 विकेट; 14.45 सरासरी

कुलदीप यादव ( भारत) 19 सामने 45 विकेट; 17.77 सरासरी

आदील रशीद ( इंग्लंड) 24 सामने 42 विकेट; 27.47 सरासरी

मुजीब उर रहमान ( अफगाणिस्तान ) 20 सामने 37 विकेट; 19.54 सरासरी

तेंदाई चतारा ( झिम्बाब्वे) 21 सामने 30 विकेट; 27.03 सरासरी

मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश ) 18 सामने 29 विकेट; 21.72 सरासरी

युजवेंद्र चहल ( भारत) 17 सामने 29 विकेट; 26 सरासरी

मोईन अली ( इंग्लंड ) 24 सामने 29 विकेट; 34.48 सरासरी

अकिला धनंजया ( श्रीलंका) 16 सामने 28 विकेट; 23 सरासरी

लुंगी एनगिडी ( दक्षिण आफ्रिका ) 13 सामने 26 विकेट; 23.03 सरासरी