मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाचं 'Miss World'शी लग्न; युवराज सिंगनं घेतली होती दोघांची फिरकी

Ben Cutting marries Erin Holland मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज अडकला लग्नबंधनात

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग ( Ben Cutting) आणि टीव्ही प्रेजेंटर एरिन हॉलंड ( Erin Holland) हे दोघं लग्नबंधनात अडकले. मे 2019मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता आणि गेली अनेक वर्ष ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत.

एरिन ही 'मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलिया' आहे. बेन व एरिन यांनी यापूर्वी दोन वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे लग्न स्थगित केले होते. 2019मध्ये कॅनडा ग्लोबल ट्वेंटी-20 स्पर्धेत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांना लाईव्ह मुलाखतीत बेन व एरिन यांची फिरकी घेतली होती. .

एरिन बेनची मुलाखत घेत होती आणि तेव्हा युवराज मध्येच आला, तुम्ही लग्न कधी करताय? मला तयारी करायला लागेल? असं युवीनं त्यांना विचारलं. त्यावर दोघंही जोरजोरात हसू लागले होते.

एरिन एक गायिका, टीव्ही होस्ट, मॉडल, डान्सर आणि चॅरीटी वर्कर आहे. याशिवाय तिनं मिस वर्ल्ड ओशियाना हा किताबही जिंकला आहे.

34 वर्षीय बेन कटिंगनं ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 4 वन डे आणि 7 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.