IPL 2021: चीन ठरला यंदाच्या आयपीएलचा विजेता!, भन्नाट मिम्स एकदा पाहाच...

IPL 2021: कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं जाहीर केला आहे. आयपीएल स्थगितीच्या निर्णायानंतर सोशल मीडियात क्रिकेट चाहत्यांची फार मोठी निराशा झाल्याचे मिम्स व्हायरल झाले आहेत. यातील काही भन्नाट मिम्स पाहुयात...

आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या एकूण चार संघांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोनाच्या प्रकोपामुळे आयपीएल स्पर्धेवर गंडांतर आलं आणि कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाला. याचाच धागा पकडून चीननं आयपीएल स्पर्धा स्थगित करुन दाखवली असा संदेश देणारं एक मिम व्हायरल झालं आहे.

आयपीएल सामन्यांमधील खेळाडूंच्या निराशाजनक भावनांचे फोटो काहींनी ट्विट करुन क्रिकेट चाहत्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोनाचं संकट असल्यामुळे लॉकडाऊन लादलेल्या नागरिकांसाठी आयपीएल हे मनोरंजनाचा मार्ग ठरत होता. पण आता आयपीएल स्थगित झाल्यानं संध्याकाळचा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

काही क्रिकेट चाहत्यांनी तर यंदाच्या संकटकाळातही आयपीएलमधून खेळाडूंनी त्यांचं मनोरंजन करण्याचं काम केल्यामुळे स्पर्धेचे आभार देखील मानले आहेत. यात मुंबई इंडियन्सचा खेळाडू कायरन पोलार्डच्या धमाकेदार खेळीचा दाखल देऊन क्रिकेट चाहते आभार व्यक्त करत आहेत.

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचा नेहमी संबंध जोडला जातो. तसा तो आयपीएल स्थगित झाल्यानंतर जोडला गेला नाही तर नवलच. नेटिझन्सनं बॉलिवूड चित्रपटातील प्रसंगांची आठवण करुन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

आयपीएल स्थगित झाल्यामुळे कुटुंबातील काही सदस्य खूश तर काही सदस्य नाराज झाल्याच्या प्रसंगावरही मिम्स तयार करण्यात आलेत.

काहींनी तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट 'थ्री इडियट्स'मधल्या भूमिकांचे हावभाव दाखवून आयपीएल स्थगित झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पसरलेल्या निराशेच्या वातावरणाची जाणीव करुन दिली आहे.

यंदाच्या सीझनमध्ये कधी नव्हे ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ तुफान फॉर्मात असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता आयपीएल स्थगित झाल्यामुळे बंगलोर संघाच्या चाहत्यांमध्येही मोठी निराशा झाली आहे. यावरुनही भन्नाट मिम तयार करण्यात आलेत.

दरम्यान, आयपीएल स्थगित होण्याआधी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटवरही ब्लॉक करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली होती. यावरुनही मिम्स तयार करण्यात आले आहेत.

बॉलिवूडमध्ये गाजलेल्या 'हेरा फेरी' चित्रपटातील परेश रावल, अक्षय कुमार यांच्यातील एका संवादावरुनही मिम्स तयार करण्यात आले आहेत.

आयपीएलच्या बायो-बबलमध्ये त्रृटी आढळल्यामुळेच कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या मुद्द्यावरुन बीसीसीआयला लक्ष्य करणारे मिम्स देखील व्हायरल होत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला यंदाच्या आयपीएलवरील स्थगितीचा सर्वाधिक फटका बसल्याचं नेटिझन्समध्ये बोललं जात आहे. याचाच दाखला देणारं हे आणखी एख मिम.