विराट कोहलीच्या घरी गुड न्यूज? अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याचा फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने नुकतंच प्रेयसी नताशा स्टँकोव्हिच प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली होती.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत विराटनं अनुष्काच्या पोटावर हात ठेवला आहे.

कोहली आणि अनुष्का यांनी 11 डिसेंबर 2017मध्ये लग्न केलं. काही महिन्यांपूर्वी विराटच्या घरी पाळणा हलणार असल्याची चर्चा समोर आली होती.

प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी हैराण केल्याचे अनुष्कानं एका कार्यक्रमात सांगितले होते.

प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी हैराण केल्याचे अनुष्कानं एका कार्यक्रमात सांगितले होते.

पण, तसं काही नाही. व्हायरल होत असलेला फोटो एडिट करण्यात आल्याचे दिसत आहे.

या फोटोची सत्यता तपासल्यानंतर हा जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचा फोटो असल्याचे समोर आहे. त्यांच्या चेहऱ्याच्या जागी अनुष्का व विराटचा फोटो एडिट करण्यात आला आहे.

Read in English