विराट पुरस्कार स्वीकारत असताना अनुष्काने असं केलं चिअर!

सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेला कर्णधार विराट कोहली मंगळवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख केंद्र ठरला.

कोहलीला गेल्या दोन मोसमातील शानदार कामगिरीसाठी पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विराटबरोबर त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माही हजर होती.

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने २०७-१७ आणि २०१७-१८ या मोसमामध्ये एकहाती वर्चस्व राखले.

सध्या आयपीएलमध्ये झालेल्या मानेच्या दुखापतीतून सावरत असलेल्या कोहलीवर उपचार सुरु असून यामुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघारही घ्यावी लागली.