पाकिस्तानविरुद्ध खेळायचा होता सामना अन् BCCIला न कळवता सचिन तेंडुलकर कुटुंबीयांसोबत फिरायला गेला खंडाळा

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्वचितच कुठल्या वादात अडकला किंवा पडला असेल... मैदानावर आणि बाहेरही सचिनचा स्वभाव शांतच होता.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्वचितच कुठल्या वादात अडकला किंवा पडला असेल... मैदानावर आणि बाहेरही सचिनचा स्वभाव शांतच होता. अनेक खेळाडूंनी कारकिर्दिदरम्यान बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली, परंतु सचिनकडून असे कधीच झाले नाही. पण, बीसीसीआयला न कळवता एकदा सचिन तेंडुलकर सुट्टीसाठी कुटुंबीयांसोबत खंडाळ्याला गेला होता.

1998साली भारताचे दोन संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळत होता. अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी मलेशियाला गेला होता. पण, राष्ट्रकुल स्पर्धेत सचिनचा फॉर्म काही चालला नाही आणि भारताला साखळी फेरीतच बाहेर व्हावे लागले.

याच कालावधीत भारताचा दुसरा संघ कॅनडातील टोरँटो येथे पाकिस्तानविरुद्ध सहारा कप खेळत होता. राष्ट्रकुल स्पर्धेतून टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात येईपर्यंत इथे पाकिस्तानविरुद्ध तीन सामने झाले होते.

बीसीसीआयनं सचिन, अजय, रॉबिन सिंग आणि अनिल कुंबळे यांना कॅनडात पाठवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून हे खेळाडू पाकिस्तानविरुद्धचे उर्वरित दोन सामने खेळू शकतील.

राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना सहारा कपमध्ये खेळण्यावर पाकिस्ताननं आक्षेप नोंदवला. त्यामुळे बीसीसीआयनं जडेजा व सचिनला पाठवण्याचा निर्णय घेतला.

जडेजा चौथा सामना खेळण्यासाठी कॅनडात पोहोचला, परंतु सचिनचा काहीच पत्ता लागत नव्हता. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर सचिन कुटुंबीयांसोबत पिकनिकला खंडाळ्याला गेला होता. बीसीसीआयलाही हे माहित नव्हते.

कसा बसा त्यांना सचिनचा पत्ता लागला आणि सचिन पाकिस्तानविरुद्ध अखेरचा सामना खेळण्यासाठी कॅनडात पोहाचला. त्या सामन्यात सचिननं 77 धावा केल्या.

सचिनच्या खेळीनंतर पाकिस्ताननं हा सामना 5 विकेट्स राखून जिंकला आणि सहारा कप 4-1 अशा फरकानं नावावर केला.

Read in English