Yuzvendra Chahal ची पत्नी Dhanashree Verma ने डीप नेक ड्रेस घालून केलं 'बोल्ड' फोटोशूट; पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 04:11 PM2022-05-14T16:11:46+5:302022-05-14T16:14:47+5:30

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हीच्या बोल्ड फोटोशूटची सध्या चर्चा आहे.

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हीच्या बोल्ड फोटोशूटची सध्या चर्चा आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये धनश्री राजस्थान रॉयल्सच्या प्रत्येक सामन्यात पती युजवेंद्रला चिअर करण्यासाठी दिसतेय...

तेथेची तिचा ग्लॅमरस अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण, आज तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगलीय.

पेशान कोरिओग्राफर असलेली धनश्री सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतेच.. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. त्या व्हिडीओंना चाहत्यांची पसंतीही मिळतेय.

पण, आज तिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा आहे. तिच्या फोटोंवरून नेटिझन्सची नजरच हटत नाहीए... तिने डिप नेक आउटफिट घातला आहे. त्याशिवाय तिने डायमंड इयररिंग्सही घातले आहेत.

बोल्ड मेकअफ केल्याने ती अजूनही खुलून दिसतेय आणि नेटिझन्स तिच्या सुंदरतेचं कौतुक करताना थकत नसल्याचे कमेंट्समध्ये दिसतेय.

धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.