Sara Tendulkar Princess Photos: तेंडुलकरांची 'राजकुमारी'..... पाहा सारा तेंडुलकरचे पिवळ्या ड्रेसमधील सुंदर फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:26 PM2022-05-15T20:26:43+5:302022-05-15T20:30:19+5:30

साराच्या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स आले आहेत.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायमच अँक्टिव्ह असते.

सारा आपले छान-छान फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. तिचे फोटो चांगलेच चर्चेत असतात आणि व्हायरलही होतात.

सारा तेंडुलकरने नुकतेच आपले काही छानशे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची बरीच चर्चा रंगली आहे.

साराने शनिवारी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, या सुंदर कपड्यांमध्ये मला एखादी राजकुमारी असल्यासारखंच वाटतंय.

साराचा हा सुंदर ड्रेस डिझायनर गोपी वैद यांनी डिझाइन केला आहे. साराने या पिवळ्या ड्रेसमधील तीन फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच छान दिसतेय.

साराच्या या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. सारा गेल्या काही दिवसांपासून बरेच फोटो पोस्ट करताना दिसत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चाही रंगताना दिसत आहे.