Sara Tendulkar Photoshoot: सारा तेंडुलकरचा हॉट अंदाज! नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:38 PM2022-05-05T19:38:28+5:302022-05-05T19:57:00+5:30

सारा लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकणार?

Sara Tendulkar Photoshoot: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी आणि IPL 2022 मुळे चर्चेत असलेला अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची बहिण सारा तेंडुलकर कायमच तिच्या अदांमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.

सारा ही फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरूक असल्याने तिची तरूणाईमध्ये खास चर्चा असते.

याच दरम्यान, सारा तेंडुलकर सध्या एका फोटोशूटमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

साराने काही दिवसांपूर्वी व्हिडिओग्राफर आणि एडिटर हवे आहेत, अशी जाहिरात आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीद्वारे पोस्ट केली होती.

सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. साराच्या या फोटोशूटने चांगलीच वाहवा मिळवल्याचे दिसत आहे.

साराने vis . a . via या नावाच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोला चार तासांतच १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्याचे दिसून आले आहे.