'माझ्यासोबत असं केवळ एकदाच झालं, पण..'; परिणीतीने सांगितल्या ब्रेकअपच्या कटू आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 05:30 PM2021-10-22T17:30:00+5:302021-10-22T17:30:00+5:30

Parineeti chopra: परिणीती बॉलिवूडमधील काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा. कलाविश्वाप्रमाणेच परिणीती सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनयासोबतच गायनाची विशेष आवड असलेली परिणीती कायमच तिच्या प्रोफेशन लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.

परिणीती बॉलिवूडमधील काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

परिणीतीची मुख्य भूमिका असलेला जबरियाँ जोडी हा चित्रपट अनेकांच्या लक्षात असेल. या चित्रपटावेळी परिणीतीने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं होतं.

ब्रेकअपमुळे आपल्या भावनांचं प्रचंड नुकसान होतं. भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो असं तिने या मुलाखतीत म्हटलं होतं.

"माझ्या आयुष्यातील वाईट दिवसांमधील ब्रेकअपचा दिवस होता. मी प्रचंड मोठ्या हार्टब्रेकमधून बाहेर पडले आहे. माझ्यासोबत हे फक्त एकदाच झालं.पण मी पूर्णपणे कोलमडून गेले. यापूर्वी मी आयुष्यात कधीच रिजेक्शनला सामोरी गेले नव्हते", असं परिणीती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्या प्रसंगानंतर मी स्वत:चा तिरस्कार करु लागले होते. या घटनेमुळे फक्त मीच नाही तर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. पण, या परिस्थितीत माझ्या कुटुंबाने मला सावरलं. मी देवाचे आभार मानते कारण, आता मी पूर्वीपेक्षा खूप समजूतदार झाले."

दरम्यान, परिणीती आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्या रिलेशनशीपच्या एकेकाळी प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. परंतु, मनीषसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती चरित देसाईला डेट करत असल्याचं समोर आलं होतं.

परिणीतीची मुख्य भूमिका असलेले 'इश्‍कजादे' आणि 'शुद्ध देसी रोमांस' हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अलिकडेच तिने द गर्ल ऑन द ट्रेन आणि सायना या चित्रपटांमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं.