'मन झालं बाजिंद'मधील सोज्वळ कृष्णाचा BOLDअंदाज; खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:30 PM2021-10-21T18:30:00+5:302021-10-21T18:30:00+5:30

Shweta kharat: कलाविश्वाप्रमाणेच श्वेता सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा ती तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'.

या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात आणि वैभव चव्हाण मुख्य भूमिकेत झळकले आहेत. विशेष म्हणजे ही जोडी सध्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेत्री श्वेता खरात या मालिकेत कृष्णा ही भूमिका साकारत असून ती प्रचंड सोज्वळ, संयमी, हुशार आणि आदर्श मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे.

पडद्यावर अत्यंत साधी वाटणारी कृष्णा म्हणजेच श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

कलाविश्वाप्रमाणेच श्वेता सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा ती तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

श्वेताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

अलिकडेच श्वेता घेतला 'वसा टाकू नको' या कार्यक्रमात झळकली होती.

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतही ती झळकली असून तिने मोनी ही भूमिका साकारली आहे.

वेस्टर्न आऊटफिटसोबतच श्वेता पारंपरिक साडीमध्येही छान दिसते.

श्वेताला ग्लॅमरस फोटोशूट करण्याची विशेष आवड असल्याचं या फोटोवरुन दिसून येतं.

श्वेताने फोटोशूट पैकी एक सुंदर फोटो