Brooklyn Beckham and Nicola Peltz Wedding: प्रसिद्ध खेळाडूच्या मुलाने अमेरिकन मॉडेलसोबत थाटला संसार; पार पडला शाही विवाहसोहळा! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 09:17 PM2022-04-09T21:17:00+5:302022-04-09T21:47:42+5:30

पाहा त्या मॉडेलचे 'बोल्ड & बिनधास्त' फोटो

Brooklyn Beckham and Nicola Peltz Wedding: खेळाडू आणि अभिनेते-अभिनेत्री यांची प्रेमप्रकरणं आजकालच्या जगाला नवीन नाहीत. बडेबडे खेळाडू अभिनेत्रींशी प्रेमविवाह करतात. मात्र, एका खेळाडूचा मुलगा अमेरिकन मॉडेलसोबत संसार थाटला.

दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचा मुलगा ब्रुकलिन बेकहॅम ९ एप्रिलला लग्नबंधनात अडकला. ब्रुकलिन हा अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल निकोला पेल्ट्झसोबत विवाहबद्ध झाला.

११ जुलै २०२० रोजी ब्रुकलिन आणि निकोला यांनी ते रिलेशनशीपमध्ये असून साखरपुडा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर ते लवकर विवाहबद्ध होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

ब्रुकलिन आणि निकोला यांचा शाही विवाहसोहळा फ्लोरिडा येथील पाम बीच येथील हवेलीत पार पडला. या हवेलीची मालकी निकोलाचे व्यापारी वडील आर. नेल्सन यांच्या नावे आहे. तेथे तब्बल ३ दशलक्ष युरो खर्च करून या शाही विवाह संपन्न झाला.

अभिनेत्री इवा लोंगोरिया, अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर निकोल रिची, मॉडेल गिगी हदीद आणि गॉर्डन रॅमसे या साऱ्या लग्नाला उपस्थित होत्या. तसेच, अनेक बड्या हस्तींनीही लग्नाला हजेरी लावली.

निकोलाची आई क्लॉडिया कॅथलिक आहे, त्यामुळे आधी कॅथोलिक रितीरिवाजांनुसार लग्न पार पडणार असून त्यानंतर निकोलाच्या वडिलांच्या इच्छेनुसार ज्यू रिवाजांनुसार लग्नाचे विधी केले जाणार आहे.

जाणून घेऊया निकोला ऍनी पेल्ट्झ नक्की कोण आहे?

निकोला ऍनी पेल्ट्झचा जन्म ९ जानेवारी १९९५ रोजी झाला. बेट्स मोटेल या अमेरिकन मालिकेतील ब्रॅडली मार्टिन या भूमिकेमुळे निकोलाला ओळख मिळाली.

२०१४ साली तिने ट्रान्सफॉर्मर्स- एज ऑफ एक्सटीन्क्शन मध्ये टेसा येगरची भूमिका साकारली. तिची ती भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

ब्रुकलिन बेकहॅमबद्दल बोलायचं तर तो पेशाने शेफ आणि फुटबॉलपटू आहे. त्याने काही काळ मॉडेलिंगही केलं आहे.