Bhaubeej special: सेलिब्रिटींची भाऊबीज! मराठी सेलिब्रिटींचे रिअल लाईफ भाऊ-बहिण माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 08:00 AM2021-11-06T08:00:00+5:302021-11-06T08:00:02+5:30

Bhaubeej special: आज भाऊबीज. भारतीय संस्कृतीचा अभिमान. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा पवित्र सण. यादिवशी या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सेलिब्रिटीही हा सण उत्साहात साजरा करतात. तेव्हा पाहुया मराठी सेलिब्रिटींच्या भाऊबहिणींच्या जोड्या...

मराठी, गुजराती, हिंदी अशा अनेक सिनेमांत नाव कमावणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला दोन भाऊ आहेत. संदीप आणि संदेश. दरवर्षी सोनाली संदेश आणि संदीप यांच्यासोबत भाऊबीज आनंदात साजरी करते.

मराठी सिनेइंडस्ट्रीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचा भाऊ अतुल कुलकर्णी हा सुद्धा चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यासोबतचे अनेक फोटो सोनाली शेअर करत असते.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही लहान भाऊ आहे. रूपाली बिग बॉस मराठीमध्ये गेली होती, तेव्हा तिचा भाऊ तिला भेटायला आलेला तुम्ही पाहिला असेलच.

अभिनेता शशांक केतकरच्या बहिणीला तुम्ही ओळखत असालच.‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत दिसलेली दीक्षा केतकर शशांकची सख्खी बहीण आहे.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेची बहिण म्हणजे स्वानंदी बेर्डे. स्वानंदी ही अभिनयची एकुलती एक बहिण. दोघांचाही मस्त बॉन्ड आहे. अनेकदा दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

अभिनेता सिद्धार्थ जाधवला एक बहीण आणि एक भाऊ आहे. तिघा भावंडांमध्ये सिद्धार्थ सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका.

अमेय वाघ याला एक लहान बहीण आहे. तिच्यासोबतचे फोटो तो शेअर करत असतो.

अभिनेत्री पूजा सावंतला श्रेय नावाचा लहान भाऊ आहे. श्रेयसोबतचे अनेक फोटो पूजा शेअर करत असते.

अभिनेत्री संस्कृती बालगुडेला समर्थ नावाचा लहान भाऊ आहे. दोघांमध्ये खूप चांगला बॉन्ड आहे.

गश्मीर महाजनीला त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी बहीण आहे. ती म्हणजे माझी छोटी आई,असं गश्मीर म्हणतो.