ऐश्वर्या रायने करिअरमध्ये केल्या ‘या’ 8 चुका, पश्चाताप तर आजही होत असावा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 04:25 PM2021-11-01T16:25:12+5:302021-11-01T16:33:25+5:30

Aishwarya Rai Birthday: ऐश्वर्यानं एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑफर नाकारल्या. याचा पश्चाताप कदाचित आजही तिला होत असावा...

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस. ऐश्वर्या मॉडेलिंगमध्ये आणि तिला सिनेमाच्या ऑफर मिळणं सुरू झालं. पण ऐश्वर्यानं एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑफर नाकारल्या. याचा पश्चाताप कदाचित आजही तिला होत असावा...

मॉडेलिंगच्या दिवसांतच एक सुपरहिट सिनेमा ऐश्वर्याला ऑफर झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं,‘राजा हिंदुस्तानी’. कारण काय तर ऐश्वर्या मणिरत्नम आणि राजीव मेननची फॅन होती. त्यामुळे तिने डेब्यूसाठी ‘इरूवर’ हा सिनेमा निवडला. पण इरूवर या सिनेमाला जेमतेम यश मिळालं. याऊलट राजा हिंदुस्तानी सुपरडुपर हिट ठरला.

‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमाही आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. राणी मुखर्जीच्या रोलसाठी ऐश्वर्याला विचारणा झाली होती. पण तिने हा सिनेमा नाकारला. बॉलिवूडमध्ये नवखी असली तरी लोक तिची तुलना सीनिअर अभिनेत्रींशी करू लागले होते. अशात ‘कुछ कुछ होता है’मधील रोल ऐश्वर्याला काहीसा बालिश वाटला होता.

दिल तो पागल है या सिनेमासाठीही तिला विचारणा झत्तली होती. यश चोप्रा ऐश्वर्याला ‘मैंने तो मोहब्बत कर ली’ या सिनेमातून लॉन्च करू इच्छित होते. पण ऐश्वर्याने सिनेमा नाकारला. पुढे हाच सिनेमा दिल तो पागल है नावाने रिलीज झाला होता.

ऐश्वर्याने नाकारलेला आणखी एक सिनेमा म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. होय, ऐश्वर्याने नाकारला आणि हा सिनेमा ग्रेसी सिंगच्या झोळीत पडला.

ऐश्वर्याने होकार दिला असता तर शाहरूखच्या ‘वीरजारा’ या सिनेमातही ती दिसली असतील. तिने नकार दिला म्हणून मग या चित्रपटात प्रीती झिंटाची वर्णी लागली.

दोस्ताना हा सिनेमाही ऐश्वर्याने नाकारला होता. त्यावेळी ऐश्वर्या प्रचंड बिझी होती. म्हणून तिने या सिनेमाला नकार दिला होता.

बाजीराव मस्तानी या सिनेमासाठी ऐश्वर्या ही भन्साळींची पहिली पसंत होती. या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या या दोघांना घ्यायची त्यांची इच्छा होती. पण भूतकाळातील काही कळू आठवणी ऐश्वर्याला पुन्हा उगाळायच्या नव्हत्या. त्यामुळे तिने सलमानसोबत काम करण्यास नकार दिला आणि मग रणवीर सिंग व दीपिका पादुकोणने हा सिनेमा केला.

भुलभुलैय्या या सिनेमातील मंजुलिकाच्या रोलसाठी ऐश्वर्याला अ‍ॅप्रोच केले गेले होते. पण ऐश्वर्याने हा सिनेमा नाकारला आणि विद्या बालनला हा सिनेमा मिळाला.

Read in English