Railway Jobs: रेल्वेत इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३,३७८ जागांवर बंपर भरती; 'असा' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:14 AM2021-06-22T09:14:27+5:302021-06-22T09:18:32+5:30

RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात....

नोकरीच्या शोधात असाल तर सरकारी नोकरीची उत्तम संधी आपल्यासमोर उपलब्ध झाली आहे. रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३० जून २०२१ पर्यंत आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी अगदी कमी दिवस शिल्लक आहेत.

दक्षिण रेल्वेमध्ये ३,३७८ पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ३० जून २०२१ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्यासाठी sr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तुम्हालाही अर्ज दाखल करायचा आहे तर मग खालील माहिती जरूर वाचा.

दक्षिण रेल्वेत कॅरेज वर्क्स पेरम्बूर येथे ९३६ जागा, गोल्डनरॉक वर्कशॉपमध्ये ७५६ जागा, सिग्नल आणि टेलिकॉम वर्कशॉपमध्ये १६८६ जागा अशा मिळून एकूण ३,३७८ जागांवर भरती केली जाणार आहे.

फिटर, पेंटर आणि वेल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड परिक्षेत इयत्ता १० वीत कमीतकमी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

मेडिकल लॅब टेक्निशिअन (रेडियोलॉजी, पॅथोलॉजी आणि कार्डियोलॉजी) पदांसाठी अर्ज करण्यासाठी इयत्ता १२ वीच्या परीक्षेसोबतच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विभागातून कमीतकमी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याशिवाय कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ट्रेड विभागात आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

इच्छुक उमेदवारांचं कमीत कमी १५ वय असणं गरजेचं आहे आणि फ्रेशर किंवा आयटीआय, एमएलटी परीक्षेस अध्याप सामोरे न गेलेल्या उमेदवार क्रमश: २२ किंवा २४ पेक्षा अधिक वय असेल तर त्यांना अर्ज दाखल करता येऊ शकणार नाही.

अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या गटातील उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.

ex-ITI प्रवर्गातील उमेदवारांची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर निवड केली जाईल. तर MLT पदासाठी १२ वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर निवड केली जाईल.

इच्छुक उमेदारांनी अधिकृत संकेतस्थळ sr.indianrailways.gov.in येथे भेट देऊन नोकरीसाठीचा अर्ज दाखल करू शकतात.

Read in English